वृक्षारोपण आणि वनीकरण

१९६९ मध्ये वन विकास मंडळाची स्थापना झाल्यापासून विविध कार्यक्रम/योजना अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आली आहेत. ही रोपवने प्रामुख्याने साग, बांबू , सिसू, शिवन आणि इतर विविध प्रजातीं आहेत. कंपनीने हाती घेतलेले महत्त्वाचे वृक्षारोपण कार्यक्रम आहेत:


१. सन १९७०-८७ या वर्षात १.२४ लाख हेक्टरवर साफ तोडीद्वारे साग रोपवने उभारणे.


२. सन १९८८-९१ मध्ये २.३५ लाख हेक्टर क्षेत्रावरील अवनत जमीन विकास कार्यक्रम.


३. सन १९९२-२००० मध्ये जागतिक बँकेच्या सहाय्याने १.२० लाख हेक्टरवर महाराष्ट्र वनीकरण प्रकल्प


४. सन २००२ -२०२२ मध्ये एकसमान प्रणालीमध्ये ( युनिफॉर्म सिस्टम) रूपांतरण अंतर्गत ०.३५ लाख हेक्टर साग रोपवने .


५. सन २००२-२०२२ मध्ये ०.३७ लाख हेक्टरवर मिश्र लागवड.


गेल्या पाच वर्षांत उभारलेल्या वृक्षारोपणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

वर्ष साग रोपवन (हे.) मिश्र रोपवन (हे.) एकूण वृक्षारोपण (हे.)
२०१८ २०८५.७१ २५४७.५० ४६३३.२१
२०१९ १५५७.९२ १६२१.०० ३१७८.९२
२०२० १६५३.२३ ६६९.०० २३२२.२३
२०२१ ९२१.०३ ७६३.७० १६८४.७३
२०२२ १८९९.७१ ५९२.७० २४९२.४१