राष्ट्रीय बांबू मिशन

बांबू पिकाची संभाव्य वापर क्षमतेच्या दृष्टीकोनातून, कृषी आणि सहकार विभाग /कृषी मंत्रालय यांच्या मार्फत मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर नावाची 100% केंद्र प्रायोजित योजनेअंतर्गत राष्ट्रीय बांबू मिशन उपयोजना म्हणून राबविण्यात येत आहे. मिशनमध्ये क्षेत्र-आधारित, प्रादेशिक भिन्नता धोरणाचा अवलंब करून बांबू लागवड आणि विपणनाखालील क्षेत्र वाढवून बांबू क्षेत्राच्या सर्वांगीण वाढीला चालना देण्याची कल्पना आहे. या मिशन अंतर्गत, नवीन रोपवाटिकांच्या उभारणीला आणि विद्यमान रोपवाटिकांच्या बळकटीकरणाला पाठबळ देऊन दर्जेदार लागवड साहित्याची उपलब्धता वाढवण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. बांबू उत्पादनांचे, विशेषतः हस्तकला वस्तूंचे विपणन मजबूत करण्याकरीता मिशन प्रयत्नशील आहे.