टप्पे

महाराष्ट्र वनविकास महामंडल, मर्यादित ची स्थापना १९७४ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून करण्यात आली, ज्याचा उद्देश कमी किमतीच्या विविध प्रजातीय संकीर्ण जंगलाचे मुख्यतः सागवान आणि इतर मौल्यवान प्रजातींचा समावेश असलेल्या उच्च मूल्याच्या जंगलात रूपांतर करणे आहे.


महाराष्ट्र वनविकास महामंडळ हे भारतातील काही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमापैकी १९८८ - ८९ पासुन सतत नफयात चालु असलेले महामंडळ आहे.


१. बिजघटक व रोपवाटिकेला दर्जेदार सागवान बियाणे व साग जडी ISO-9001- 2008 प्रमाणित मानांकन प्राप्त झाले आहे.


२. हरीत महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण योगदान. एफडीसीएम लि.ने ५.३१ लाख हेक्टर मध्ये रोपवन उभारणी केली असुन त्यास आतापर्यंत १.४४ लाख हेक्टरसह सागवान लागवड, ज्याचे बाजार मूल्य अंदाजे रु.३५०० कोटी आहे.


३. १९९० पासून, टर्नकी वृक्षारोपण, २७० प्रकल्प अंतर्गत २५०० हेक्टर क्षेत्रावर ६० लाख रोपाची यशस्वीपणे लागवड करण्यात आली असुन प्रकल्पाचा खर्च रु. ३५०० लाख आहे.


४. ३.४३ लाख हेक्टर वनजमिनीचे शाश्वत व्यवस्थापनामार्फत बाजारपेठेत उच्च दर्जाचे लाकूड उत्पादन करुन देणे आणि त्या बदल्यात, जंगलाच्या आसपासच्या खेड्यांमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांसाठी रोजगार निर्मिती करणे.


५. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा आणि बोर व्याघ्र प्रकल्प येथे इको-टूरिझमला प्रोत्साहन देणे.


६. गोरेवाडा, नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची रचना, बांधकाम आणि संचालन करणे तसेच जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी गोरेवाडा, नागपूर येथे बायो-पार्क आणि बचाव केंद्राची रचना, विकास आणि संचालन करणे.


७. सांगली जिल्ह्यातील कुंडल फॉरेस्ट अकादमी येथे सह्याद्री फ्लोरल बायोपार्कची आणि राजभवन, नागपूर येथे जैव-विविधता उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे.


८. जैव-विविधता आणि वन्यजीव संरक्षण उपाययोजनेमुळे म.व.वि.म. क्षेत्रात वाघासह वन्य प्राण्यांची मुबलक उपस्थिती दिसून आली आहे.


९. २००९-१० पासून सतत लाभांश जाहीर करणे.