बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आणि बचाव केंद्र

महाराष्ट्र शासनाने, सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने वित्तपुरवठ्यावर महाराष्ट्र वनविकास महामंडळ मार्फत १९१४ हेक्टर वनजमिनीवर नागपूर जिल्ह्यातील गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय आणि बचाव केंद्र स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी केला. गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय आणि बचाव केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र वनविकास महामंडळ केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून अगोदरच आवश्यक परवानगी मिळाली आहे. त्याबाबत भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाची अनिवार्य परवानगीही मिळाली आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. तपशीलवार मास्टर प्लॅन (डीपीआर) तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सल्लागाराने त्यासाठी रु. ४५१.३१ कोटी खर्चाचा आराखडा तयार केला होता.


प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:


एकूण प्रकल्प क्षेत्रः १९१४ हेक्टर वनजमीन आणि २५.५७ हेक्टर गैर वन सरकारी जमीन.


प्रकल्पाचे घटक याप्रमाणे आहेत : भारतीय सफारी, आफ्रिकन सफारी, रात्र सफारी, जैवउदयान, डीप टाईम ट्रेल, ट्रेल ऑफ सेन्स, ट्रायबल व्हिलेज ट्रेल, रिव्हर राइड, गोरेवाडा रिझर्व, एन्ट्रन्स प्लाझा, बर्ड वॉकिंग एव्हरी, रेस्क्यू सेंटर आणि इतर संबंधित आकर्षणे. एस.पी.व्ही. (स्पेशल पर्पज व्हेईकल) ची स्थापना महाराष्ट्र वनविकास महामंडळ (म.व.वि.म.) अंतर्गत केली जाणार आहे. त्यास महाराष्ट्र वनविकास महामंडळ चे मेमोरँडम ऑफ असोसिएशन आर्टिकल ९२ (२) अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे. एफडीसीएम आणि खाजगी गुंतवणूकदारांची एक संयुक्त उद्यम कंपनी स्थापन केली जाईल व त्यात म.व.वि.म. चे (५१ % शेअर) आणि खाजगी भागीदार असेल.


महाराष्ट्र राज्याने वायबिलिटी गॅप फंडिंग रु. १८३.६३ कोटी याशिवाय वनजमीन, जंगलेतर जमीन आणि गोरेवाडा येथे बांधलेल्या पायाभूत सुविधा ज्यात बचाव केंद्र, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, जलकुंभ इत्यादी देण्याचे मान्य केले आहे.


हा प्रकल्प ४ वर्षात पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर अंदाजे २७ लाख लोक येण्याची शक्यता आहे, तर तिकीटाची किंमत रु. ५० ते रु. ५०० आहे. या प्रकल्पातुन वार्षिक ५५ कोटी पर्यंत महसूल आणणे आणि त्यास येणारा खर्च ४० कोटी रुपये एवढा असुन सवलत कालावधी ५० वर्षे आहे. या कालावधीत प्रकल्पाचे व्यवस्थापन जॉइंट व्हेंचर कंपनीद्वारे केले जाणार आहे. कंपनी आपली मानव संसाधने कामावर नियुक्त करेल प्राणीसंग्रहालयातील प्राणी खरेदी करेल, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU) मार्फत पशुवैद्यकीय सेवा प्रदान करणे व वन्यजीव क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे . वन्यजीव प्रशिक्षित पशुवैद्यांची एक पिढी तयार करुन वन्य प्राण्यांच्या क्षेत्रात मानक प्रोटोकॉल स्थापित केले आहे.