निसर्ग पर्यटन‍

आम्ही लोकांना अशा प्रकारे जगायला प्रेरित करू इच्छितो जे नैसर्गिक विश्वाचे कल्याण करेल. आम्ही पर्यावरण परीसंस्था प्रदर्शन, शिक्षण आणि संवर्धनामध्ये उत्कृष्टता मिळविण्याचा प्रयत्न करू आणि नागरिकांना पर्यावरण पर्यटनाकरीता प्रोत्साहीत करु.


महामंडळाच्या उपक्रमात विविधता आणण्यासाठी आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी ‍ निसर्ग पर्यटन‍ उपक्रम सर्वप्रथम दिनांक १५ ऑगस्ट २००० रोजी ठाणे विभागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे सुरू करण्यात आला. संचालक मंडळाने २२ सप्टेंबर २००० रोजी झालेल्या ११२ व्या बैठकीत हा उपक्रम राबविण्यास औपचारिक संमती दिली.


महामंडळाने रिसॉर्ट व्यवस्थापक / सहाय्यक रिसॉर्ट व्यवस्थापकच्या एका विशेष कॅडरची भरती केली आहे. जेणेकरुन पाच संरक्षित क्षेत्रांमध्ये व लगत नऊ स्थळे व्यावसायिक पद्धतीने चालवतील. महामंडळातील ‍ रिसॉर्ट व्यवस्थापकांना आदरातिथ्य व्यवस्थापनात प्रशिक्षित आहे आणि काहींना अमेरीका आणि युनायटेड किंग्डम येथील नामांकित हॉटेल्समध्ये सेवा देण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ने देखील या सेवांच्या विकासामध्ये योगदान दिले आहे आणि दोन्ही महामंडळाचा ऑक्टोबर २०१६ पर्यंतचा ‍ निसर्ग पर्यटन सामंजस्य करार देखील केला आहे.


महामंडळाद्वारे खालील भागात निसर्ग पर्यटन प्रकल्प चालवले जातात:-


१. वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील बोर.


२. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा.


३. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा, पिटेझरी आणि उमरझरी.


४. भंडारा जिल्ह्यातील कुसुमतोंडी (नागझिरा) येथे २ होम स्टेची सोय.