राजभवन राज्यपाल निवासस्थान येथे जैवविविधता उद्यानाचा विकास

जैवविविधता उद्यान राजभवन संकुल, सेमिनरी हिल, नागपूर

परिचय-

राजभवन संकुल हे नागपूरमध्ये राजभवन इमारत, कर्मचारी निवासस्थान, इतर संस्थांना दिलेली क्षेत्र, महापालिका सुविधा लॉन्स आणि उद्यान वृक्ष आच्छादीत आहे. या संकुलाच्या सीमा भिंतीने संरक्षित केलेल्या आहेत त्यामुळे राजभवन शहराच्या इतर भागांपासून विशिष्टपण रेखाटते. राजभवन संकुलाला प्रवेश नियमन करण्याकरीता सदर बाजार बाजूला [पूर्वेकडील] आणि सेमिनरी हिल्सच्या बाजूला [पश्चिमेकडील] द्वार आहे . राजभवन इमारत सेमिनरी टेकडीवर एक भव्य स्मारक म्हणून वसलेली आहे. केशरी-हिरव्या शहराच्या हिरव्या चेहऱ्यावर निसर्गानेच गुलाबी दागिना जडवला असुन, हिरवा विवेक आणि जागरूकता आजूबाजूला पसरवल्याचा भास होतो.


प्रकल्प तपशील:-

राजभवन संकुल, नागपूरच्या जैवविविधता उद्यानच्या स्वरुपात लँडस्केप वृक्षारोपण आणि सुशोभीकरणासाठी रु. १३९.१५ लाख रुपयांचा प्रकल्प प्रस्ताव तीन वर्षांच्या कालावधीसाठी तयार करण्यात आला होता, जो सन २००९-१० ते सन २०१२-१३ या कालावधीसाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव यांच्याद्वारे मंजुर करुन कार्यन्वित करण्यात आला होता. मॅंगनीज ओर इंडिया लिमिटेड [मॉयल], नागपूरने प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला.
जैवविविधता उद्यानामध्ये जुलै आणि ऑगस्ट २०११ मध्ये थीमनिहाय वृक्षारोपण करण्यात आले. यात ३०० हून अधिक विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले असुन यात विविध थीम समाविष्ट आहेत:-

१) ५७ प्रजातींचे १६६९ वृक्ष इथॅनोबोटॅनिकल संग्रह.


२) २४ सुगंधी प्रजातींचे ५९१ वृक्षारोपण.


३) ३८ पवित्र प्रजातींचा संग्रह ९२४ वृक्ष.


४) १८ प्रकारच्या पर्यावरणास अनुकूल आणि हवा शुद्ध करणारी प्रजाती.


५) २४ प्रकारच्या शोभेच्या प्रजाती ५९६ वृक्ष.


६) १० प्रजातीचे २२८ बांबु .


७) १८ प्रजाती असलेले पाल्मेटस ३०७ वृक्ष.


८) ४० प्रजातींचे स्थानिक प्रजातींचे १७९० वृक्षाची लागवड.


९) नक्षत्र दुर्मिळ, दशमूल आणि बल्बशियस ५६ प्रजातींची लागवड.


१०) १३ प्रजातीचे पक्षी आकर्षित करणारे २३० वृक्ष.


११) ३० प्रजातीचे फुलपाखरू आकर्षित करणारे ७७१ वृक्ष.


१२) ३८ प्रमाणातील कॅक्टि आणि रसाळ प्रजातीचे १२५० वृक्ष.


१३) २१ प्रजातींचे शेल्टरबेल्ट १७८२ वृक्ष.८००० कोरफडीची रोपे घटक सीमांकन उंचवटयावर घटक सीमांकनासाठी लावण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त:


१) हर्बल गार्डन (बॅकअप गार्डन भाग II) ४५ विविध प्रजातींच्या १३६८ वृक्ष.


२) ४२ विविध प्रजातींच्या १६०० वनस्पतींचे फुलपाखरू उद्यान.


३) ५० विविध प्रजातींच्या २२८५ रोपांसह बॅकअप गार्डन प्लांटेशन आणि ५०० रोपांसह वसाहत रोपवन विकसित केले आहे.अशा प्रकारे ३१ ऑगस्ट २०११ पर्यंत एकूण २८९४८ रोपांची लागवड करण्यात आली असून एकूण उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. काही दुर्मिळ रोपे खरेदी करून योग्य ठिकाणी लावली जाणार आहेत.इतर प्रकल्प घटक

१) १.७० किमी लांबीच्या नैसर्गिक पायवाटेचे बांधकाम.


२) निरीक्षण मनोरे बांधणे.


३) ५० पक्ष्यांची घरटी तयार करून योग्य ठिकाणी झाडांवर उभारण्यात आली आहेत.


४) राजभवन इमारतीजवळ धबधब्याचे बांधकाम.* जैवविविधता उद्यानात २२ डिसेंबर २०११ रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.