बांबू

वनविकास महामंडळाने सर्व भारतीय बांबूंपैकी सर्वात सामान्य, मौल्यवान आणि सर्वत्र वापरल्या जाणा-या, डेंड्रोकॅलॅमस स्ट्रिक्टस हा लांब बांबू आणि पल्प करण्यायोग्य लहान बांबू (बंडल) या दोन्ही स्वरूपात तयार केले जाते. बांबूची ताकद, त्यांचा सरळपणा, कडकपणा, त्यांचा पोकळपणा, ज्यामुळे त्यास विभाजित करणे सोईचे आणि आकारमानामुळे बांबू विविध उद्देशांसाठी योग्य ठरतो. ते लाकडाला पर्यायी म्हणुन वापरले जाते आणि काही घरे पूर्णपणे बांबू आणि त्याच्या उत्पादनांपासून बनविली जातात. मचान, शिडी, पूल, कुंपण इत्यादींसाठी वापरले जाते तसेच दररोज वापरात येणारे असंख्य साहित्य जसे की बेड, काठ्या, तंबू, खांब, ब्रश, टोपल्या, चटया इत्यादी बनवल्या जातात. भारतातील कागद उद्योगात बांबू ही अत्यंत महत्त्वाची सामग्री आहे. बांबूचा वापर रेयॉन पल्पसाठीही केला जातो.